राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनीद्वारा संचालित स्थानिक गोविंद विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा माजी खासदार सुनील मेंढे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना मेंढे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, शिस्त, संस्कार आणि परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले; केवळ अभ्यासातच नव्हे, तर कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन स्वतःचा आत्मविश्वास वृद्धिंगत करावा, असे