कळमनूरी: शिवसेनेला धक्का, वारंगा फाटा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचासह एका सदस्याचा भाजपात जाहीर प्रवेश
कळमनुरी तालुक्यातील दोन नंबरची ग्रामपंचायत असलेल्या वारंगा फाटा येथील शिवसेना शिंदे गटाचे सरपंच राहुल प्रभाकर थोरात आणि ग्रामपंचायत सदस्य जनार्दन थोरात या दोघांनी भाजपाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजाननराव घुगे,आमदार तान्हाजी मुटकुळे, मा.आ.रामराव वडकुते,रुपेश कदम आदींच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेतला असल्याची माहिती आज दिनांक 29 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .