तालुक्यात नसलेल्या भाटपुरी गावाचा बोगस आयडी तयार करून ४ हजार ९०० खोट्या जन्म नोंदी केल्याने बिहारच्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पारोळा येथील पोलिसांनी यवतमाळ जाऊन त्यास दिनांक 16 रोजी ताब्यात घेतले. संशयित आता पोलिसांच्या ताब्यात असून त्यास पारोळा न्यायालयात हजर केले असता 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .