चिकलठाण्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, कंटेनरच्या धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा अंत; ३ चिमुकल्यांचं छत्र हरपलं
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 9, 2026
छत्रपती संभाजीनगर:भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालक निष्पाप नागरिकांचे बळी कसे घेतात, याचा एक भीषण प्रत्यय चिकलठाणा परिसरात आला आहे. चिकलठाणा आठवडी बाजारासमोर एका सुसाट कंटेनरने दिलेल्या धडकेत शहाबाज कमरोद्दीन बागवान या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या अपघातामुळे तीन चिमुकल्यांच्या डोक्यावरचे पितृछत्र हरपले आहे.