कुडाळ: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचा उद्देश सफल करा : पालकमंत्री नितेश राणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान ग्राम ते शहराच्या विकासासाठी असणार आहे. त्यामुळे या अभियानातील प्रत्येक गोष्ट साकार करण्याचा प्रयत्न करा, आणि बघा तुमच्या गावामध्ये कसा बदल होतो, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. अभियानाच्या शुभारंभानंतर ते सिंधुदुर्गनगरी येथे बोलत होते.