अलीकडच्या कालावधीत काही समाजमाध्यमांद्वारे तसेच काही व्यक्तींद्वारे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या कार्यवाही विषयी अपूर्ण व दिशाभूल करणारी माहिती प्रसारीत करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाबीमुळे महामंडळाची बदनामी होत असून प्रामुख्याने मराठा समाजामध्ये व जनसामान्यांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.