चाळीसगाव (प्रतिनिधी): धुळे-चाळीसगाव-संभाजीनगर या नॅशनल हायवे क्रमांक २११ वर मालेगाव बायपास उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने वेळेवर मदत पोहचवल्याने त्याला तातडीने उपचार मिळू शकले.