आंबेडकरी जनतेचा रेल्वे स्टेशन परिसरात भव्य सोहळा; शहिदांच्या स्मृतींना उजाळा चाळीसगाव (प्रतिनिधी): १ जानेवारी १८१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर झालेल्या ऐतिहासिक लढाईतील शहिदांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चाळीसगाव येथे भीमा-कोरेगाव शौर्यदिन मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा करण्यात आला. रेल्वे स्टेशन परिसरातील विजयस्तंभ प्रतिकृतीला मानवंदना देऊन आंबेडकरी जनतेने शौर्य दिनाचा जयघोष केला.