अंबरनाथ: अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक स्थगित
नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींच्या प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील काही नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे. यात अंबरनाथ नगरपरिषदेचाही समावेश आहे. अंबरनाथ नगरपरिषदेची संपूर्ण निवडणूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या 2 डिसेंबरला होणारं मतदान आता थेट 20 डिसेंबरला होणार आहे. निवडणूक अधिकारी विजयानंद शर्मा यांनी याबाबतची माहिती आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास दिली आहे.