सायबर पोलीस स्टेशनमध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्यादी महिलेचे फोटो आणि माहिती वापरून बनावट फेसबुक आयडी तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्यांचा फोटो वापरून अप्रामाणिकपणे आणि गैरउद्देशाने एक फेसबुक खाते तयार केले होते. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला