राज्य शासनामार्फत कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभावाने कापूस खरेदीची प्रक्रिया कपास किसान ॲपद्वारे राबविण्यात येत आहे. मात्र सध्याच्या ऑनलाईन नोंदणी, अप्रुव्हल व स्लॉट बुकिंगच्या बहुपर्यायी व तांत्रिक प्रक्रियेमुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे निदर्शनास आले. अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसणे, ॲप वापरण्याचे मर्यादित ज्ञान, आधारकार्ड व सातबारा अपलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तसेच सीसीआयकडून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध होणारे स्लॉट यामुळे मोठ्या.....