शेतकऱ्यांच्या जोडव्यवसायावर घाला घालणाऱ्या दुभत्या जनावरांच्या चोरी करणाऱ्या सराईत टोळीला अटक करण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे.या कारवाईत पाच गुन्हे उघडकीस आले असून, पाच दुभती जनावरे व चोरीसाठी वापरलेले पिकअप वाहन असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.