कळमेश्वर: शिवसेना उबाटा गटाचे मंगेश गमे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या समस्या मार्गी
शेतकरी नारायण रामकृष्ण वानखेडे यांच्या खात्यावर शासनाच्या विविध योजना अंतर्गत आलेली नुकसान भरपाई संजय गांधी योजना आणि पीएम किसान योजनेची रक्कम चुकीने पीक कर्जाकडे वळविण्यात आली होती शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजना रक्कम कर्ज कपातीसाठी वापरणे नियमबाह्य असून यामुळे वानखेडे यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते ही बाब समजतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मंगेश गमे यांनी कॅनरा बँक व्यवस्थापकाशी तातडीने संपर्क साधून योग्य तो प्रश्न उपस्थित केला