महाराष्ट्र पणन महासंघाच्या वतीने राज्यातील सर्व धान खरेदी संस्थांसाठी असलेली १५ लाख रुपयांच्या उलाढालीची अट आज ११ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण निर्णय घेत रद्द करण्यात आली आहे. मार्केटिंग फेडरेशनच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे धान खरेदी संस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल भंडारा जिल्हा धान खरेदी संघाच्या वतीने महाराष्ट्र पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, मार्केटिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष रोहित निकम, तसेच अतुल गण्यार पवार व सुभाष रघाताटे....