अकोट तालुक्यातील ऐतिहासिक श्रीमंतीची साक्ष असणारा वनवैभवात आकर्षक डौलाने उभा असणारा नरनाळा किल्ल्याचा नरनाळा महोत्सव सुमारे 13 वर्षानंतर या वर्षी पुन्हा होणार आहे.यामुळे वन पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यावर्षी 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती प्रशासना द्वारा देण्यात आलीय या नरनाळा महोत्सवाच्या अनुषंगाने वन पर्यटन, जंगल सफारी, पक्षी निरीक्षण ,मेळघाटची आदिम संस्कृती यासह विविध भरगच्च कार्यक्रम पार पडणार आहेत.