फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणार्या मुख्य आरोपी शिवकुमार दत्तात्रय खरात याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मंगळवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार मोतीतलाव परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांनी दिली. याप्रकरणी तक्रारदार सुनिल आसाराम जाधव, रा. अयोध्या नगर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.