विरोधक खोटं बोलत असून त्यांनी माझ्याशी डिबेट करावे, आ.शंकरराव गडाख यांच्याच काळात शहरात विकास झाला मागील एका वर्षात विरोधकांनी काय दिवे लावले असा सवाल माजी सभापती सुनीता गडाख यांनी केला.नगरपंचायत निवडणुकीप्रसंगी क्रांतिकारी शेतकरी पक्ष व आम आदमी पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सुनीता गडाख यांनी शक्तिप्रदर्शन करत शहरातून रॅली काढली.यावेळी त्या बोलत होत्या.