कळमनूरी: भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने वर्ल्डकप जिंकला,कळमनुरीच्या लेकीचा कोलंबोत डंका,उपकर्णधार गंगाच्या फुटाणा गावात जल्लोष
कोलंबो मध्ये रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय अंध क्रिकेट संघाने नेपाळ महिला संघाला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत 7 विकेट्स ने पराभूत करून विजेते पदक पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.या संघाच्या उपकर्णधार गंगा कदम या कळमनुरी तालुक्यातील फुटाणा गावचा रहिवाशी आहेत,त्यांच्या या कामगिरीमुळे हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर फुटाणा येथे मोठा जल्लोष साजरा करण्यात आला आहे,गंगा ही गावी आल्यानंतर या गावात तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत होणार असल्याची माहिती आज दि.25 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे