समुद्रपूर: गिरड आर्वी रस्त्यावर दुचाकी अनियंत्रित होऊन दुचाकीस्वार जखमी
समुद्रपुर तालुक्यातील गिरड आर्वी रस्त्यावर गिरड वरुन तावी गावाकडे जाणारी दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.प्राप्त माहितीनुसार १ जुन रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गिरड वरून तावी गावाला जात असलेल्या दुचाकीस्वार अजय पांडुरंग घानोडे राहणार संत तुकडोजी वार्ड याची दुचाकी अनियंत्रित होऊन तो खाली पडून जखमी झाला घटनेची माहिती मिळताच गिरड पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी गणेश झाडे यांनी जखमी अजयला उपचारासाठी गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.