भंडारा: खासदार प्रफुल्ल पटेलांनी दरवर्षी प्रमाणे सपत्नीक घेतलं चांदपुरच्या हनुमानाचं दर्शन....
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चांदपूर येथील जागृत हनुमान मंदिरातील हनुमानाचं दर्शन दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी दुपारी एक वाजता हनुमान जयंती निमित्त राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा पटेल, आमदार राजू कारेमोरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते.