धुळे: नगरपरिषद निवडणुकांसाठी पोलीस प्रशासन सज्ज; पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी घेतला बंदोबस्ताचा आढावा
Dhule, Dhule | Nov 30, 2025 धुळे जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी शिरपूर, शिंदखेडा आणि पिंपळनेर येथे बंदोबस्ताचा आढावा घेत निर्देश दिले. मतदान केंद्र व १०० मीटर परिसरात कडक बंदोबस्त, तसेच सेक्टर पेट्रोलिंग, SST-FST पथके तैनात आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांपासून स्ट्राँग रूमपर्यंत सुरक्षेची विशेष काळजी घेतली असून RCP, SRPF आणि राखीव पोलीस दल सतर्क ठेवण्यात आले आहेत.