आर्णी तालुक्यातील नागपूर–तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी येथे आज दिनांक 16 डिसेंबर रोजी दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. अपघातात जखमी झालेल्या दुचाकी चालकाचे नाव तुषार प्रमोद ठाकरे (वय 25, रा. कोसदनी) असे आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत तुषार ठाकरे याला तातडीने आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र जखमा ग