कोणत्याही तीर्थक्षेत्राला नाही गेला तरी चालेल, पण रायगड किल्ल्यावर जाऊन माथा टेकवून या," असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक आणि 'पानिपतकार विश्वास पाटील यांनी कवी माधव यांच्या रायगडावरील कवितेचा संदर्भ देत केले. खालापूर तालुक्यातील माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी यशवंतराव आनंदराव उर्फ आण्णासाहेब देशमुख स्मृती समिती आणि विद्या प्रसारिणी सभा चौक यांच्या वतीने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पानिपतकार विश्वास पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.