लाखनी: गुरढा येथे शासकीय जागेवर अतिक्रमण; परस्पर विक्रीचा प्रयत्न : तहसीलदारांकडे तक्रार
गुरढा येथील ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अवैधरित्या बांधकाम करून ती जागा परस्पर विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अतिक्रमणाविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरढा येथील शासकीय जागेवर परिसरातील रहिवासी विष्णू गिरमारे यांनी अनधिकृतरीत्या बांधकाम सुरू केले असून स्वतःचा मालकी हक्क दाखवत संबंधित जागेची विक्री करण्याचा प्रयत्न केला.