साकोली तालुक्यातील गुडरी चिचगाव गटग्रामपंचायतचे उपसरपंच विकास रहांगडा यांच्यासह त्यांच्या लहान भावाला जागेच्या वादातून तीन आरोपींनी जबर मारहाण केली यात उपसरपंच जखमी झाल्याने भंडारा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.तीनही आरोपीविरुद्ध दि.24ला गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना सोमवार दि.22 ला सकाळी आठ वाजता साकोली तालुक्यातील चिंचगाव येथे घडली आरोपींवर कठोर कारवाई करून अटक करण्याची मागणी उपसरपंच विकास रहांगडाले यांनी गुरुवार दि25 डिसेंबरला दुपारी चार वाजता केली आहे