वडवणी तालुक्यातील काडीवडगाव रस्त्याच्या कडेला झाडी आणि दगडमातीचे ढिगारे साचल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत होता. गुरुवार, दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता हा रस्ता जीसीबीच्या सहाय्याने दुरुस्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. या रस्ता दुरुस्तीच्या कामात ग्रामस्थ बजरंग साबळे, अरुण काळे, संदीपान खळगे आणि महादेव अंबुरे यांनी सहयोग दिला आहे.