इंदापूर: मतासाठी विरोधी पक्षाचा कोण आला तर त्याचा पाहुणचार करा पण मता बाबतीत ठोस भूमिका सांगा- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
Indapur, Pune | Apr 21, 2024 इंदापूर तालुक्यातील विरोधक तुमच्या घरी येतील गोड बोलतील, गाडीत बसवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा चांगला पाहुणचार करा परंतु मताच्या बाबतीत ठोस भूमिका सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करा. असे आवाहन माजी मंत्री राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. वडापुरी येथे भाजप कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन (रविवार दि २१) केले होते यावेळी ते बोलत होते.