आज दिनांक 20 डिसेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास अंबरनाथमध्ये 200 संशयित बोगस मतदार ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अंबरनाथ पोलिसांनी सुमारे 200 जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे परिसरातील इमारतीत ठेवले आहे. सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी सुरू असून. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याची चौकशी होत आहे. भाजप व काँग्रेसकडून काल रात्री 200 बोगस मतदार असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.