हिंगणघाट नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात उच्च शिक्षित डॉ नयनाताई उमेश तुळसकर यांनी तब्बल १८ हजार ७५ मताधिक्याने विजय संपादन केला असून त्याच्या सोबतीला ४० पैकी ३० नगरसेवक निवडून आले आहे.यावर बोलताना डॉ तुळसकर म्हणाल्या की ५ वर्ष काम करताना मी आरोग्य,स्वच्छता लोकांना स्वच्छ पाणी मुलांना न.प.च्या शाळेतून चांगल शिक्षण सोबतच घनकचरा व्यवस्थापन व लोकाभिमुख प्रशासन देऊन हिंगणघाट शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा मानस व्यक्त केला