मकर संक्रांति निमित्त बीड सितेपार येथे ओम जय जगद्गुरु ताज मेहंदी बाबा दरबार असून या ठिकाणी चार दिवसीय यात्रेचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, आज दि. 17 जानेवारी रोज शनिवारला दुपारी 2 वाजता जगद्गुरु ताज मेहंदी बाबा यांच्या दरबारात दहीहंडी पूजनाचे कार्यक्रम घेण्यात आले, या कार्यक्रमात भंडारा जिल्हा परिषदेचे वित्त व आरोग्य सभापती आनंद मलेवार यांनी भेट देत ओम जय जगद्गुरु ताज मेहंदी बाबा दरबार येथे दर्शन घेत दहीहंडीचे पूजन केले.