चोपडा: चुंचाळे येथील तिघांनी यावलच्या विरार नगर मध्ये येऊन महिलेस केली मारहाण, यावल पोलीस ठाण्यात नोंदवली तक्रार
Chopda, Jalgaon | Nov 17, 2025 चुंचाळे या गावातील रहिवाशी अब्दुल तडवी, रहिमान तडवी, जावेद तडवी व अल्ताफ तडवी या चौघांनी यावल येथे येऊन यावलच्या विरार नगर मध्ये जरीना अब्दुल तडवी वय ३३ या महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तेव्हा महिलेने दिलेल्या तक्रारीवरून चार जनाविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे