ट्रक घेण्यासाठी माहेरहून दिड लाख रुपये आणण्याचा सततचा तगादा लावून विवाहितेवर शारीरिक व मानसिक छळ झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. याबाबत राजुर कॉलरी, ता. वणी येथील 26 वर्षीय पीडित महिलेने पोलीस स्टेशन वणी येथे दिलेल्या तक्रारीवरुन विवाहितेच्या पतीसह घुग्गुस येथील सासरकडील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.