अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याचा तपास भरकटल्याचा आरोप करत आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकारी जालना आरोपींना वाचवत असल्याचा आरोप केला. अंबड-घनसावंगीतील ७४ दोषी कर्मचारी-अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून सेवेतून बडतर्फ करण्याची त्यांनी मागणी केली. कारवाई न झाल्यास विधानसभेचे कामकाज ठप्प करण्याचा इशारा त्यांनी नागपूर अधिवेशनात दिला.