सिन्नर । येथील भैरवनाथ महाराज मंदिरासमोरील रस्त्यावर अंदाजे ४० वर्ष वयाच्या महिलेचा बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. अंगात लाल रंगाचे स्वेटर, हिरव्या रंगाचे ब्लाऊज व हिरव्या रंगाची साडी घातलेली ही महिला परिसरात राहणारे सागर बोडके यांना बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.