पुसद शहरातील प्रभाग क्रमांक 15 आणि 1 मध्ये स्वच्छते संदर्भात नगराध्यक्षा सौ. मोहीनी नाईक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला.लोकसहभाग मिळाल्या शिवाय नगरपरिषद प्रशासनाला अपेक्षित यश मिळणार नसल्याचे सांगून प्रभागातील जाणकार लोकांनी स्वच्छतेच्या संदर्भातील जागृती साठी कसोटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगून, लवकरच प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छता अधिकारी कर्मचारी व घंटागाडी चालकांचे संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी सांगितले.