गुरुवार दिनांक 4 डिसेंबरला सायंकाळी पावणे सात वाजताच्या दरम्यान कार व दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकी चालक युवक गंभीर जखमी झाला असून त्याचा पाय तुटला आहे. हा अपघात टी -पॉईंट शितलवाडी ते मौदा मार्गावरील किट्स महाविद्यालय, रामटेक च्या समोरील चौरस्त्यावर घडला. माहितीप्रमाणे एनटीपीसी येथे कार्यरत युवक आपल्या दुचाकी क्रमांक एम एच 40 एव्ही 94 60 ने वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या कारची धडक झाली. यातच दुचाकी चालक गंभीर जखमी झाला.