नोकरीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी निघालेल्या कोंभळी (ता. कर्जत) येथील सख्खे भाऊ राशीन शिवारात झालेल्या अपघातात ठार झाले. विवेक सतिष भापकर आणि सार्थक सतिष भापकर ठार झालेल्या भावंडांची नावे आहे. याबाबत राशीन पोलीस दुरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.