दारव्हा तालुक्यातील वडगाव आंध येथे राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान २०२५–२६ अंतर्गत तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने संस्थास्तरावरील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी करण्यात आले. हे प्रशिक्षण श्री. सीताराम शेळके यांच्या शेतात संपन्न झाले.