दोन डिसेंबर ला पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीचा निकाल आज लागला असून गोंदिया नगर परिषदेत काँग्रेस पक्षाचे सचिन शेंडे तर गोरेगाव नगर पंचायतीत काँग्रेस पक्षाचे तेजराम बिसेन आणि सालेकसा नगर पंचायतीत काँग्रेस पक्षांचे विजय पुंडे तर तिरोडा नगर परिषदेत भाजपचे अशोक असाटी नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. गोंदिया भाजप उमेदवार कशीश जायसवाल यांच्या प्रचारार्थ भाजपच्या दिग्गजांनी फिल्डिंग लावली होती. मात्र भाजपला अपयश आले.