मारेगाव: भीषण अपघात : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण तरुणी ठार मारेगाव येथील तुळशीराम बार रेस्टॉरंट समोर घडला अपघात
वणी वरुन मोपेड दुचाकीने मारेगावकडे जात असताना आयशर वाहनाने समोरुन धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण व तरुणी घटनास्थळीच ठार झाले. हृदयाचा थरकाप उडविणारा हा भीषण अपघात मारेगाव जवळ तुळशीराम बार अँड रेस्टॉरंटजवळ शनिवारी रात्री 8 वाजता दरम्यान घडला. गौरव बापुराव आत्राम (23), रा. गौराळा, तालुका मारेगाव व नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (17), रा. बोपापूर (कायर) मृतकाचे नाव आहे.