पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या चांपा-बाजार चौक कूही-मांढळ येथे गुप्त माहितीच्या आधारे अवैधरित्या सट्टापट्टीवर कुही पोलिसांनी धाड टाकून 3 आरोपीस ताब्यात घेऊन कुही पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चे वृत्त असे की कुही पोलीसांचे पथक गस्तीवर असतांना गुप्त माहितीच्या आधारे 3 वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या सट्टा जुगारावर धाड टाकून आरोपीस ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. असून घटनेचा तपास कुही पोलीस करीत आहेत.