शहापूर: शहापूर येथून आदिवासी बांधवांचा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा ठाण्यात दाखल
Shahapur, Thane | Sep 15, 2025 आदिवासी उलगुलान मोर्चासाठी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून आदिवासी बांधव ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. शहापूर ते मंत्रालय असा या मोर्चाचा प्रवास असून आदिवासी बांधवांच्या महत्त्वाच्या १९ मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. बंजारा समाज व धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये, ही मुख्य मागणी आहे. शहापूर येथून निघालेला आदिवासी बांधवांचा मोर्चा आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४च्या सुमारास ठाण्यात दाखल झाला आहे.