तालुक्यातील वाहितपूर येथे क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी एकास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना बुधवार, दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत हर्षल आनंद भगत (वय ३२, रा. वाहितापूर) यांनी प्रतीक धाबर्डे, पीयूष लोटे व सचिन पाटील (सर्व रा. वाहितापूर) यांच्याविरुद्ध ता. १ जानेवारीला दुपारी ४.३० वाजता सेलू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.