अकोट: अंजनगाव मार्गावरती इको व्हॅन व दुचाकीचा अपघात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यूची प्राथमिक माहिती
Akot, Akola | Dec 3, 2025 अंजनगाव मार्गावरती इको व्हॅन व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना बुधवारी घडली या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले होते दोघांच्याही पायाला व मांडीला मोठ्या प्रमाणावरती अपघातामध्ये जखमा होत्या.मात्र या दोघांनाही प्रथम उपचारासाठी अकोट ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात येऊन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले होते मात्र या ठिकाणी उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.