अड्याळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिखली आणि सालेवाडा येथील शेतशिवारात रानटी अस्वलाचे दर्शन झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, वनविभागाच्या तत्परतेमुळे संभाव्य धोका टळला आहे. शेतात अस्वल वावरत असल्याची माहिती मिळताच अड्याळ सहवनक्षेत्र व केसलवाडा नियतक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अस्वलाचा मुक्काम शेतातच असल्याचे लक्षात येताच वन कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि आरडाओरडा करून अस्वलाला शेतशिवारातून सुरक्षितरीत्या जंगलाच्या दिशेने पळविले.