पोलीस स्टेशन कुही अंतर्गत येत असलेल्या वार्ड क्रमांक 4 मांढळ येथे घरी कुणी नसतांना घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेस करून नगदी रुपये आणि सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मांढळ येथे उघडकीस आली.घरमालक हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. घरमालक दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर घराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. आतमध्ये पाहिले असता चोरी झाल्याचे दिसून आले. कुही पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.