मावळ: उर्से निर्भया प्रकरणी सोमवारी मावळ बंदची हाक
Mawal, Pune | Dec 28, 2025 मावळ तालुक्यातील उर्से गावात चिमुकलीवरील अत्याचार आणि खुनाच्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेला सतरा दिवस उलटूनही आरोपीला शिक्षा न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.आरोपीला लवकर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी सोमवारी (दि. २९) मावळ बंद ठेवण्याचा निर्णय अखंड मराठा समाजाने घेतला आहे.