स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांच्या पथकाने दारूबंदी कायद्याअंतर्गत वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घा.) पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून तब्बल ₹११,६२,८००/- किंमतीचा देशी व विदेशी दारूसह चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई १४ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास नारा फाटा, कारंजा (घा.) येथे करण्यात आली. या प्रकरणी कारंजा (घा.) पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तीन आरोपींना अटक केली आहे.