नेवासा येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त नेवासा नगरपंचायत चौक महायुतीच्या वतीने भव्य जयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी नेवासा नगरपंचायत चे नूतन नगराध्यक्ष डॉ. करणसिंग घुले यांच्यासह नेवासा शहरातील व तालुक्यातील भाजप शिवसेना महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.