महाराष्ट्राच्या बांधणीकरीता समविचारी पक्षांनी एकत्र यावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असे म्हटले आहे. सध्या देशात भाजपचे लोकशाही विरोधी राजकारण सुरू असून ते जनतेच्या हिताचे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपला पराभूत करण्यासाठी मित्रपक्ष बरोबर येत असतील तर त्यांना सोबत घ्यायला हवे, असेही मत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केल